टर्कीमध्ये 'सलमान खान कॅफे' - Marathi News 24taas.com

टर्कीमध्ये 'सलमान खान कॅफे'

www.24taas.com, मुंबई
 
टर्कीमध्ये सलमान खानचा, बटलिवूडचा आणि पर्यायाने भारताचा एक अनोखा गौरव झाला आहे. टर्कीमधील एका कॅफेला सलमान खानचं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यात कधी टर्कीला जाण्याचा योग आला, तर या कॅफेला नक्की भेट द्या. सलमान खानच्या फॅन्ससाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे.
 
टर्कीमधील माद्रीन शहरातील या कॅफेचं नाव आधी ‘कॅफे देल- मार’ असं होतं . शहरामधील तरुणांचा आणि पर्यटकांचा हा एक लाडका स्पॉट आहे. ‘एक था टायगर’ सिनेमाचं शुटिंग या कॅफेपासून काही अंतरावर सुरू होतं. त्यावेळी सिनेमाच्या क्रूमधील मंडळी याच कॅफेमध्ये खान-पान करत होती. सलमान खानही या कॅफेत वारंवार असायचा. या कॅफेमध्ये काही सुधारणा व्हाव्यात, असं सलमानला मुक्कामादरम्यान वाटू लागलं. त्याने कॅफेच्या मालकाला भेटून कॅफे मध्ये बऱ्याच सुधारणा सुचवल्या.
 
“कॅफेच्या सजावटीपासून ते संगीत, खाद्य या सगळ्यांमध्ये सलमान खानने बदल घडवून आणले आणि अखेर कॅफे देल- मार पूर्णपणे वेगळंच वाटू लागलं. यामुळे कॅफे देल-मारचं नाव बदलून मालकाने त्याचं नाव कॅफे सलमान खान असंच ठेवलं.” असं यशराज फिल्म्सच्या प्रवक्त्याने सांगितलं.

First Published: Thursday, August 9, 2012, 04:14


comments powered by Disqus