Last Updated: Tuesday, December 20, 2011, 11:40
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबईत स्थायिक झाल्यानंतर माधुरीच्या सेकंड इनिंगची जोरदार चर्चा झाली. माधुरी पुन्हा स्मॉल स्क्रीनवर रिएलिटी शो करणार की फिल्मसमधून कमबॅक करणार याची उत्सुकता तिच्या फॅन्सला लागून राहिली असतानाच माधुरी एका नव्या चॅनलची सूत्रधार म्हणून आपल्या समोर आली. मात्र आजही माधुरीच्या फॅन्सला तिला बिग स्क्रीनवर पाहायचंय. त्यामुळेच अनेक निर्माते दिग्दर्शक माधुरीला आगामी सिनेमांची स्क्रीप्ट दाखवतयात. त्यात नुकतीच मधुर भांडारकरनेही माधुरीची भेट घेतल्याची न्यूज चर्चेत आहे. याबाबत मधुरनेही दुजोरा दिलाय.
मधुरच्या म्हणण्याप्रमाणे जर खरंच माधुरीने मधुरचा सिनेमा करण्यासाठी होकार दिला तर एक चांगली कलाकृती आपल्याला सिल्व्हर स्क्रीनवर पाहायाला मिळेल. मात्र हा सिनेमा कुठल्या जॉनरचा असेल हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे. तसं पाहता स्त्री प्रधान सिनेमा करण्यामध्ये मधुरचा हातखंडा आह. तर मृत्यूदंड, प्रेमरोग, लज्जा यासारख्या सिनेमांमधूनही माधुरीने आपलं वेगळंपण सिध्द केलंय. त्यामुळे जर मधुरच्या सिनेमामध्ये माधुरी दिसली तर हा सिनेमा माईलस्टोन सिनेमांच्या यादीत जाऊन पोहचेल अशी चर्चा इंडस्ट्रीमध्ये आत्तापासूनच रंगू लागलीय.
First Published: Tuesday, December 20, 2011, 11:40