किंग आणि दबंग खानमधलं शीत युद्ध - Marathi News 24taas.com

किंग आणि दबंग खानमधलं शीत युद्ध

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
शाहरुख खान आणि सलमान खान यांनी एकाच पार्टीला हजेरी लावली निमित्तं होतं रितेश देखमुखच्या ३३ व्या वाढदिवसाचे, पण त्यांच्यात असलेला दुरावा मिटवण्यात मात्र रितेशला यश आलं नाही. एसआरके आणि सलमान या दोघांनी करण अर्जून, कुछ कुछ होता है आणि हम तुम्हारे है सनम अशा तीन सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण ऐशवर्या राय आणि सलमान खानमधल्या प्रेम प्रकरणाचा अंत झाल्यानंतर दोन्ही खानमध्ये जुंपली. रितेशच्या वाढदिवसाला ते एकमेकांसमोर आल्यानंतरही त्यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष्यच केलं.
बॉलिवूडमधले दोन्ही खान आप आपल्या कॅम्पमधल्या सदस्यांना घेऊन आले होते. सलमान सोबत अरबाज आणि सोहेल तसंच मलाईका तर एसआरके सोबत खास मित्र करण जोहर आणि अर्जून रामपाल होते. करण जोहर आणि अर्जून रामपाल यांनी मात्र दोन्ही खानसोबत वेळ घालवला. साजिद नडियाडवाला मात्र दबंग खानला चिकटूनच होता. एसआरकेची खास मैत्रिण प्रियांका चोप्रानेही सलमानला आलिंगन देत दोघांमधला दुरावा संपवला. किंग खान आणि दबंग खान यांच्या काही तू तू मै मै न झाल्याने सर्व काही सुरळीत पार पडल्याने रितेशने नक्कीच सुटकेचा निश्वास टाकला असेल.

First Published: Tuesday, December 20, 2011, 11:56


comments powered by Disqus