मराठी पाऊल हॉलिवूडकडे - Marathi News 24taas.com

मराठी पाऊल हॉलिवूडकडे

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
रवि गोडसे... आपल्याला हे नाव फारसं परिचित नसेल मात्र हॉलिवूडमध्ये सध्या या नावाची बरीच चर्चा आहे. मुळचे डोंबिवलीचे असलेल्या डॉ. रवी यांनी तीन हॉलिवूड पटांची निर्मिती केलीय आणि पुढल्या सिनेमासाठी ते सज्जही झालेत.
 
अगदी चारचौघांसारखे दिसणारे  रवी गोडसे युएसमध्ये स्थायिक आहेत. हॉलिवूडमध्ये कॉमेडी सिनेमांची निर्मिती, दिग्दर्शन ते करतातच. शिवाय फिल्मसमध्ये ऍक्टिगंही करतात. 'डॉक्टर रवि ऍन्ड मिस्टर हाईड', 'आय एम स्किझोफ्रेनिक अँन्ड सो एम आय' अशा धमाल कॉमेडी फिल्मसची निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केलंय. सध्या ते आणखी एका सिनेमावर काम करतायत ‘हेल्प मी हेल्प यू.’ ‘हेल्प मी हेल्प यू' हा पहिला हॉलिवूड सिनेमा असेल जो प्रेक्षकांना आवडला नाही, तर प्रेक्षगकांचे पैसै त्यांना माफीनाम्यसह परत करण्यात येणारेय. या उपक्रमाबद्दलंही ते भरभरुन बोलतात.
 
हॉलिवूडमध्ये नामवंत कालकारांसोबत काम करणाऱ्या रवी यांना हिंदी सिनेमासृष्टीतंही काम करण्याची इच्छा आहे. तेव्हा हॉलिवूडमध्ये झळकणाऱ्या या मराठमोळ्या टॅलेंटचे सिनेमे लवकरच भारतीय प्रेक्षकांपर्यंतंही पोहोचतील अशी आशा करुयात.
 
 

First Published: Tuesday, December 27, 2011, 13:10


comments powered by Disqus