कपुरांचा 'लेडी' दोस्ताना - Marathi News 24taas.com

कपुरांचा 'लेडी' दोस्ताना


झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनचा 'दोस्ताना' आपण सिल्व्हर स्क्रीनवर पाहिलाय. आता या सिनेमाच्या यशानंतर या सिनेमाचा पार्ट २ लवकरच आपल्या भेटीला येतोय. दोस्तानाच्या पार्ट २ मध्ये कतरिना कैफदेखील आपला जलवा दाखवणार आहे. या सिनेमाचं काम पुढील वर्षी सुरु होणार आहे.
 
मात्र, या दोस्तानासह बॉलिवूडमध्ये आणखी एक 'दोस्ताना' येणार असल्याची चिन्हं आहेत आणि हा दोस्ताना रंगणार आहे करीना कपूर आणि सोनम कपूरमध्ये. खुद्द सोनम कपूरने दोस्तानासारख्या सिनेमामध्ये काम करायला आवडेल असं विधान केलंय आणि हा दोस्ताना आपल्याला करीना कपूरसह करायला आवडेल असंदेखील स्पष्ट केलंय.
 
सोनमच्या या विधानाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. त्यामुळे एक नवा दोस्ताना तर सिल्व्हर स्क्रीनवर पाहायला मिळणार नाही ना अशी देखिल चर्चा इंडस्ट्रीमध्ये रंगतेय...

First Published: Wednesday, December 28, 2011, 09:04


comments powered by Disqus