जपानी पीएमना 'कोलावेरी डी'चा नजराणा - Marathi News 24taas.com

जपानी पीएमना 'कोलावेरी डी'चा नजराणा

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
नुषच्या ‘कोलावेरी डी’ या गाण्याने जगभरात धूम मचवली आहे. या टँगलिश (तमिळ कम इंग्लिश)  गाण्याला यू ट्युबवर तब्बल २० दशलक्ष हिट्स मिळाल्या आहेत. लोकांना 'कोलावेरी डी'ने अक्षरश:  वेडं करुन सोडलं आहे.
तमिळ स्टार धनुषच्या लोकप्रियतेने कळस गाठला आहे. आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जपानचे पंतप्रधान योशिहिको नोडा यांच्या सन्मानार्थ आयोजीत सात रेस कोर्स रोडच्या निवासस्थानी केलेल्या शाही भोजन समारंभाला धनुषाला विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. प्रेमभंगाची भळभळती जखम व्यक्त करणारं हे गाणं जगभरात अल्पावधीत लोकप्रिय झालं. आता या गाण्याचे हिंदी भाषेतही रुपांतर करण्यात आलं आहे. त्या गाण्याचे बोल ‘डिस्टन्स पे मेरे चांद चांद, मर गयी मेरी निंद’ असं आहेत. मी कोलावेरी डी कोणत्याही भाषेत गायला तयार असल्याचं धनुष म्हणाला. कोलावेरी गाणं हीट झालं त्याला त्यांनी तीन कारणं आहेत एक इंग्लिश भाषा सर्वांना जोडते, दुसरं या गाण्याला असलेलं विनोदाचं अंग आणि आशय जो तरुणांना भावतो असंही धनूषचं म्हणणं आहे.
आता बघु या जपानच्या पंतप्रधानांना हे गाणं आवडतं का आणि हो रजनीकांतचे सिनेमे जर जपानमध्ये लोकप्रिय होत असतील तर जावयाचं गाणं का नाही होणार.

First Published: Wednesday, December 28, 2011, 17:11


comments powered by Disqus