पाकमध्ये देखील 'कोलावेरी डी' ची धूम - Marathi News 24taas.com

पाकमध्ये देखील 'कोलावेरी डी' ची धूम

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
‘ कोलावेरी डी’ च्या चालीवर बेतलेलं ‘व्हेअर इज डेमोक्रसी,  डेमोक्रसी, डेमोक्रसी जी’ हे गाणं अर्थातच सध्या पाकिस्तानात  धूमाकुळ घालत आहे.  पाकिस्तानी सरकार आणि लष्करावर  मजेशीर शब्दात निशाणा साधणारं हे गाणं लोकप्रिय झालं नाही  तर नवलच.  पाकिस्तानातील राजकारणाची खिल्ली उडवणारं हे  गाणं एका टेलिव्हिजन चॅनलने तयार केलं आहे.  आणि ‘कोलावेरी  डी’ हे मुळ गाणं देखील पाक सिने षौकिनांना पसंत पडलं आहे हे  वेगळं सांगायला हवं का ?
 
पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘व्हेअर इज डेमोक्रसी’ हे गाणं यू ट्युबवर अपलोड करण्यात आलं.  या गाण्यात पाकिस्तानमधल्या जंगल राजचाही उल्लेख आहे. पाकमधल्या वास्तवाचा वेध घेणारं हे गाणं लोकांच्या मनाचा ठाव घेतं.

First Published: Wednesday, December 28, 2011, 22:43


comments powered by Disqus