Last Updated: Saturday, December 31, 2011, 20:21
झी २४ तास वेब टीम, मुंबई नवीन वर्ष बॉलिवूडसाठी लग्नाच्या धामधुमीचं असणार आहे. बॉलिवूडमधली पेअर सैफ अली खान आणि करिना कपूर तसंच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी येत्या वर्षात विवाह बंधनात अडकण्याचं निर्णय जाहीर केला आहे. सैफ आणि करिना ज्यांना सैफिना असं प्रेमाने म्हटलं जातं त्यांची रिलेशनशीप पाच वर्ष जुनी आहे. आता या जोडीने त्यांचा 'एजंट विनोद' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर २०१२च्या सुरवातीलाच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुधा हा बहु प्रतिक्षीत विवाह सोहळा फेब्रुवारी-मार्चमधे संपन्न होईल. सैफ आणि अमृता सिंग यांना दोन मुलं आहेत आणि ते विभक्त झाले आहेत. तर करिना आधी शाहीद कपूरसोबत तीन वर्षे रिलेशनशीपमधे होती.
या व्यतिरिक्त रितेश आणि जेनेलिया डिसूझा यांचे अफेअर गेली आठ वर्षे सुरु होतं. या जोडीच्या पदार्पणातील सिनेमा 'तुझे मेरी कसम' २००३ मधे रिलीज झाला होता तेंव्हा पासून हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. या जोडाचाही शानदार विवाह सोहळा फेब्रुवारी २०१२ मधे होईल. त्या व्यतिरिक्त विद्या बालन- सिद्धार्थ रॉय कपूर आणि जॉन अब्राहाम-प्रिया मारवाह हेही जन्मोजन्मीच्या ? बंधनात अडकतील अशी चिन्हं आणि जोरदार चर्चा आहे. तसंच सोहा अली खान-कुणाल खेमु आणि दिया मिर्झा-साहिल संघा हेही रेश्मी बंधनात अडकतील असं बोललं जातं आहे. त्यामुळे यंदा वर्षभर बॉलिवूडमधे शहनाईची सूरावट वाजत राहील.
First Published: Saturday, December 31, 2011, 20:21