राखीने केलं सनी लियॉनचं 'वस्त्रहरण' - Marathi News 24taas.com

राखीने केलं सनी लियॉनचं 'वस्त्रहरण'

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
सनी लियॉन बिग बॉसमधून बाहेर पडताच तिच्या फॅन्सना धक्काच बसला. कारण, ती बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यापासून तिची लोकप्रियता दिवसें-दिवस वाढतच आहे.
 
आता सनी लियॉन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आता आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमाच्या शुटिंगसाठी सज्ज झाली आहे. महेश भट्ट यांना इतकी घाई झाली होती की, त्यांनी बिग बॉसच्या घरात जाऊन सनी लियॉनला आपल्या आगामी सिनेमासाठी करारबद्ध करून घेतलं. पण,  देशी आयटम गर्ल राखी सावंत मात्र सनी लियॉन आणि महेश भट्ट या दोघांवरही चांगलीच उखडली आहे.
 
राखी म्हणाली की, सन्नी बिग बॉसमधून बाहेर पडल्याचं समजताच मला धक्का बसला कारण, नग्नता हा भारतीय लोकांच्या जास्तच जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यामुळे सनीची लोकप्रियता वाढली आहे. अशावेळी ती बिग बॉसच्या घरातून कशी काय ‘बेघर’ झाली?
 
याचबरोबर महेश भट्ट यांनी सनीला ‘जिस्म-२’ साठी साईन केलं ते फक्त तिची पॉर्न स्टारची इमेज कॅश करण्यासाठी असा सणसणीत आरोपही राखीने केला आहे.
 
मीडियाशी बोलताना राखी म्हणाली, “मला खरंच खूप आश्चर्य वाटतंय. हा चमत्कार नक्की घडला कसा? लोकांना तर अश्लील गोष्टींमध्ये भलताच रस आहे. इतरांच्या मुली- बहिणी अर्धनग्न अवस्थेत पाहण्यात लोक मग्न असतात. बहुतेक नवीन वर्षांत लोकांना अक्कल आली असावी. जर लोकांनी टीव्हीवर नग्नतेला विरोध केला असेल, तर मला खरंच या गोष्टीचा आनंद वाटतो. ­­
 
पुढे राखी असंही म्हणाली, “महेश भट्ट ‘जिस्म-२’साठी सन्नी लियॉनला साईन करत असतील तर ते फक्त तिच्या नग्नतेमुळे. अशामुळे दिग्दर्शकाचं काम सोप्पं होऊन जातं. यात दिग्दर्शकाला काही वेगळं करायची, शिकवायची गरजच नाही. महेश भट्ट सिनेमात हिरॉईन्सना आपल्या अंगावरचे कपडे काढण्याचंच काम करायला लावत असतात. सनी तर ‘या’ कामात चांगलीच पटाईत आहे. त्यामुळे महेश भट्ट यांचे काम एकदम सोप्पं झालंय.”
 
 

First Published: Thursday, January 5, 2012, 10:04


comments powered by Disqus