डॉन को बॉक्स ऑफिसपे पकडना भी नामुमकीन है - Marathi News 24taas.com

डॉन को बॉक्स ऑफिसपे पकडना भी नामुमकीन है

www.24taas.com, मुंबई 
 
किंग खानचा डॉन 2 अमेरिका आणि कॅनडातील १६० थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. डॉन 2 या सिनेमाने अमेरिकेत बॉक्स ऑफिसवर विक्रमी कलेक्शन करण्याची किमया साधली.
 
ख्रिसमस आणि वर्षा अखेरच्या सुट्टांचा लाभ घेत अमेरिकास्थित भारतीयांनी थिएटर्सवर एकच गर्दी केली आहे. डॉन 2 ने प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या अकरा दिवसात ३.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या व्यवसाय करत नव्या विक्रमाची नोंद केली. डॉन 2 ने जिंदगी ना मिलेगी दोबाराचा ३.१ दशलक्ष डॉलर्स आणि शाहरुख खानच्याच रा-वनच्या २.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कमाईचा विक्रम मागे टाकला. फरहान अख्तर दिग्दर्शित ऍक्शन थ्रिलर डॉन 2  ने सलमान खानच्या २०११ मध्ये प्रदर्शित झालेले बॉडीगार्ड आणि रेडी या दोन्ही हिट सिनेमांच्या एकत्रित कमाईपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे.
 
या सिनेमाने आजवरचं सर्वात जास्त ओपनिंगच्या विक्रमही नोंदवला. शाहरुख खानच्या माय नेम इज खानने फेब्रुवारी २०१० साली पहिल्या सात दिवसात २.५५ अमेरिकन डॉलर्सची कमाई केली होती. डॉन 2 ने माय नेम इज खानला मागे टाकत तब्बल २.६४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा व्यवसाय केला. शाहरुख खान, प्रियांका चोप्रा आणि बोमन इराणी अशी तगडी स्टार कास्ट असलेला डॉन २ अजूनही गर्दी खेचतोय.
 
 

First Published: Friday, January 6, 2012, 19:30


comments powered by Disqus