Last Updated: Wednesday, October 19, 2011, 07:41

हिंदी सिनेसृष्टी ख्यातनाम दिग्दर्शक प्रकाश झा यांनी खंडणी मागितल्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. न्युयॉर्कस्थित दोन निर्मात्यांनी आपल्याकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार झा यांनी दाखल केली आहे.
प्रकाश झा आणि या दोन निर्मात्यांमध्ये सिने निर्मिती करण्या विषयी बोलणी झाली होती आणि त्यासाठी झा यांनी पटकथाही लिहिली होती. पण काही कारणास्तव त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि सिने निर्मिती होऊ शकली नाही. यानंतर या दोन निर्मात्यांनी झा यांच्याकडे तीन कोटी रुपयांची मागणी करायला लागले. या दोघांनी प्रकाश झांना धमकी देखील द्यायला सुरवात केली. या नंतर धमक्यांना घाबरलेल्या प्रकाश झांनी अंधेरीच्या आंबोली पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.
First Published: Wednesday, October 19, 2011, 07:41