महिलांनो सावधान ! कॉस्मेटिक वापरताना...

Last Updated: Friday, January 24, 2014, 07:25

महिलांनो कॉस्मेटिक उत्पादने वापरत असाल तर सावधान बाळगा. कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये जीवघेणे घटक वापरले जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. तर काही घटक धोकादायक ठरल्याने कर्करोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहेत.

बॉलिवूडच्या दबंगचे ४८ व्या वर्षात प्रर्दापण

Last Updated: Friday, December 27, 2013, 14:15

बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर ‘दबंग’गिरी करणारा सलमान खान आज ४८ वर्षात प्रर्दापण केले. आज सलमान खानचा ४८ वा वाढदिवस आहे. सलमानचे चाहते त्याला सोशल नेटवर्किंग साईट द्वारे शुभेच्छा देत आहे.

ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचं निधन

Last Updated: Saturday, November 16, 2013, 08:45

ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचं हृदयविकाराच्या तिव्र धक्क्यानं निधन झालं. छातीत दुखत असल्यानं हिंदूजा हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. भट यांच्या निधनानं मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा!

Last Updated: Friday, August 16, 2013, 19:56

कांद्याने सध्या सगळ्यांचाच वांदा केलाय... कांद्याच्या किंमती भडकल्यानं ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आलंय... मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळं कांद्याची भाववाढ झाल्याचं तर्कशास्त्र कृषीमंत्री शरद पवार मांडतायत...

सेनेचं टार्गेट पुन्हा एकदा `पाक कलाकार`

Last Updated: Thursday, August 8, 2013, 14:35

आता शिवसेनेचा मोर्चा पुन्हा एकदा पाकिस्तान कलाकारांकडे वळला आहे. ‘पाक कलाकारांना घ्याल तर याद राखा’ असा इशारा शिवसेनेच्या चित्रपट सेनेनं दिलाय.

महाराष्ट्रातल्या दूध उत्पादनाचं नेमकं चित्र काय?

Last Updated: Friday, February 8, 2013, 20:21

गुजरात राज्य दूध उत्पादनामध्ये पुढे जात असताना महाराष्ट्र त्यात का पिछाडीवर पडतोय? महाराष्ट्रातल्या दूध उत्पादनाचं नेमकं काय चित्र आहे

ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी-सुलतानी संकट

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 08:48

औरंगाबाद जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात अडकलाय. एकीकडे कारखाना उसाचे पैसे देत नाही तर दुसरीकडे अस्मानी संकटही मोठं आहे.. त्यामुळे जगावं कसं असा प्रश्न आता शेतक-यांना पडलाय.

'प्रेम' परत येतोय!

Last Updated: Thursday, May 24, 2012, 11:56

लवकरच सलमान खान सुरज बढजात्यांच्या आगामी प्रेमकहाणीत दिसणार आहे. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन?' आणि 'हम साथ साथ है' असे तीन कौटुंबिक सुपरहिट सिनेमे सलमानने यापूर्वी राजश्री प्रोडक्शनबरोबर केले होते.

'पुरुष' पुन्हा रंगभूमीवर दाखल

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 12:42

जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि एकेकाळी मराठी रंगभूमीवर गाजलेलं 'पुरुष' नाटक नुकतंच नाट्यरसिकांच्या भेटीला आलंय. हाऊसफुलच्या गर्दीत या नाटकाचे प्रयोग सुरु आहेत.

आता चायनिज नव्हे तर बिहारी राईस

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 22:24

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एका ग्राम पंचायतीने भातपीक उत्पादनात चीनचा विक्रम मोडला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी ही माहिती संसदेला दिली.

इस्रायलमध्ये...दुध..दुध.. है वंडरफुल्ल!

Last Updated: Monday, March 19, 2012, 22:03

विक्रम काजळे
जगात दूध उत्पादनामध्ये इस्त्रायल देश अग्रेसर आहे तर दूध उत्पादनातील आधुनिक यंत्रणेच्या संशोधनात अफिमिल्क ही संस्था अग्रेसर आहे. या संस्थेतील इलिपिलीस या शेतकऱ्याने १९७६मध्ये मिल्क मिटरची निर्मिती करुन सर्वांना चकित केलं.

अण्णागिरी नंतर आता फ्लॅश मॉब

Last Updated: Thursday, December 29, 2011, 19:26

नागपुरात एका नागरी संघटनेने अण्णा आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढ्याला समर्पित एका फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपुरातल्या तेलंगखेडी तलाव परिसरात दुपारी ३ ते सांयकाळी ५ वाजपर्यंत हा फ्लॅश मॉब आयोजीत करण्यात आला आहे

खंडणीच्या धमकीने प्रकाश झा यांना 'अंधेरी'...

Last Updated: Wednesday, October 19, 2011, 07:41

हिंदी सिनेसृष्टी ख्यातनाम दिग्दर्शक प्रकाश झा यांनी खंडणी मागितल्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. न्युयॉर्कस्थित दोन निर्मात्यांनी आपल्याकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार झा यांनी दाखल केली आहे.