कतरिना-रजनीचा करिष्मा लवकरच रुपेरी पडद्यावर - Marathi News 24taas.com

कतरिना-रजनीचा करिष्मा लवकरच रुपेरी पडद्यावर

www.24taas.com, चेन्नई
 
बॉलिवूडची सम्राज्ञी कतरिना कैफ लवकरच दक्षिणेचा देव रजनीकांतसोबत तमिळ सिनेमात काम करणार आहे. हा सिनेमा रजनीकांतची कन्यका सौंदर्या दिग्दर्शित करणार आहे.सिनेमाशी संबंधित एका सूत्राने सांगितलं की हे खरं आहे आणि कतरिना यात काम करावं यासाठी आम्ही आग्रही आहोत. दक्षिण आणि उत्तरेतील सुपरस्टार तर रुपेरी पडद्यावर एकत्र आले जादू करतील यात काहीच शंका नाही. गेले काही दिवस यासंदर्भात बोलणी चालु आहेत. सध्या कतरिना यश चोप्रांच्या सिनेमाच्या शुटमध्ये व्यस्त आहे आणि येत्या काही महिन्यात तिने डेटस देण्याचं मान्य केलं आहे.
 
सौंदर्याकडे याबाबत विचारणा केली असता तिने या वृत्ताला दुजोरा दिला आणि तिने कतरिनाशी बोलणी चालु असल्याचं सांगितलं. कतरिना सध्या सलमान खानसोबत एक था टायगरच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. तसंच शाहरुख खानसोबतही एका सिनेमाचं शुट चालु आहे. या दोन्ही सिनेमांचे शुट संपत आलं आहे आणि फक्त कतरिनाची भूमिका असलेला काही भागाचं चित्रिकरण शिल्लक आहे.
 
'कोचादाईयाँ' या तमिळ सिनेमात रजनीकात शिवभक्ताची भूमिका साकारत आहे. कतरिना आणि रजनीकांत यांची प्रेमकहाणी भव्य प्रमाणावर चित्रित करण्यात येणार आहे. या सिनेमाचे संगीत दिलं आहे ए.आर.रहमान यांनी आणि त्याने एक सुंदर चालीचं गाणं बांधलं आहे. कतरिना सध्या खुप बिझी असली तरी रजनीकांत सोबत काम करण्याचं तिचं बरेच दिवसांचे स्वप्न आहे. आता ही जोडी रुपेरी पडद्यावर कशी दिसेल याची उत्सूकता प्रेक्षकांनाही नक्कीच असेल.
 
 

First Published: Tuesday, January 10, 2012, 20:29


comments powered by Disqus