Last Updated: Friday, January 13, 2012, 21:19
www.24taas.com, मुंबई या वीकेण्डला फिल्म्स तर भारंभार, पण पाहायची नेमकी कोणती अशी अवस्था प्रेक्षकांची झाली आहे. तब्बल चार हिंदी फिल्म्स प्रदर्शित होऊनही बॉक्सऑफीसवर चित्र मात्र फारसं खास दिसत नाही. नसिरुद्दिन शाह, अतुल कुलकर्णी, केके मेनन आणि रविकिशन या चौकडीच्या ‘चालीस चौरासी’ या सिनेमाला प्रेक्षकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. बॉक्सऑफीसवर ४० टक्के ओपनिंग आहे.
याशिवाय ‘घोस्ट’ ही हॉरर फिल्मदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शायनी अहुजा आणि सायली भगतची ही ‘हॉरर’ फिल्म बॉक्सऑफीसवर जादू दाखवण्यात मात्र अपयशी ठरली आहे. घोस्टला जेमतेम ३० टक्के ओपनिंगवर समाधान मानावं लागलं. तर ‘टूटिया दिल’ आणि ‘साड्डा अड्डा’ या सिनेमांकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवणंच पसंत केलं.
त्यातल्या त्यात ह़ॉलिवूड फिल्म्सचं ऑप्शन मात्र वीकेण्डला ट्राय करायला हरकत नाही कारण ‘ब्युटी एण्ड द बीस्ट’ आणि ‘अर्थर ख्रिसमस’ या एनिमेटेड थ्रीडी फिल्म्स पाहणं बच्चेकंपनीने पसंत केलं आहे. त्यामुळे या वीकेण्डला बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडलाच प्रेक्षकांनी ‘थम्सअप’ केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
First Published: Friday, January 13, 2012, 21:19