'कोलावेरी डी'ला ट्रेडमार्क मिळणार - Marathi News 24taas.com

'कोलावेरी डी'ला ट्रेडमार्क मिळणार

www.24taas.com, मुंबई
 
'कोलावेरी डी’ ने देशभरात अभूतपूर्व असा धुमाकुळ घातला. आता अभिनेता धनूषच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा या गाण्यामुळे खोवला जाणार आहे. सोनी म्युझिक एन्टरटेनमेंट गाण्याची पहिली ओळ ‘व्हाय धिस कोलावेरी डी’ चे ट्रेडमार्कसाठी अर्ज करण्याचा विचार करत आहे.
 
आता पर्यंत भारतात कोणत्याही गाण्याच्या पहिल्या ओळीसाठी ट्रेडमार्क घेण्यात आलेलं नाही. कोलावेरी डीसाठी ते घेतल्यास ते ट्रेडमार्क मिळवणारं पहिलं गाणं ठरेल. सोनी म्युझिकला या ट्रेडमार्कचा ब्रँड म्हणून वापर करायचा आहे आणि ज्यामुळे इतरांना त्याचा वापर करता येणार नाही. सोनीने नोव्हेंबर २०११ मध्ये हे गाणं तमिळ आणि इंग्लिशमध्ये रेकॉर्ड केलं होतं.
 
‘कोलावेरी डी’ हे गाणं अल्पावधीत जगभरात हीट झालं आणि युट्युबवर त्याला तब्बल २० दशलक्ष हिट्स प्राप्त झाल्या. कोलावेरी गाण्याची नक्कल विविध भाषांमध्ये दहा वेगवेगळ्या प्रकारात करण्यात आली. एका वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार ट्रेडमार्क नोंदणीकरणाच्या क्लास ९ आणि क्लास ४१ नुसार सोनी सीडी, कॅसेट आणि एसडी कार्ड्स तसंच फिल्मी आणि नॉन फिल्मी कंटेट आणि टँलेंट डिस्कव्हरी कार्यक्रमांचे ब्रँडिंग ‘व्हाय धीस कोलावेरी डी’ ने करु शकेल.

First Published: Wednesday, January 18, 2012, 21:23


comments powered by Disqus