'कोलावरी डी'चा 'धनुष' बनणार 'रांझा' - Marathi News 24taas.com

'कोलावरी डी'चा 'धनुष' बनणार 'रांझा'

www.24taas.com
 
साऊथचा सुपरस्टार धनुष आता रांझा बनणार आहे. धनुष आणि रांझा? हे काय कॉम्बिनेशन आहे. कोलावरी या गाण्याने धनुषला रातोरात स्टार केलं. कोलावरीच्या धूनवर सारेच बेभान झाले. या गाण्याचं हिंदी वर्जन कधी येतं याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. तसंच या हिंदी वर्जनमध्ये चमकायलाही अनेक बॉलिवूड स्टार्सही टपल्येत मात्र अद्याप धनुषने हे गाणं कोणालाही दिलेलं नाही.
 
त्यामुळे या गाण्याचं हिंदी वर्जन येईल तेव्हा येईल मात्र सध्या धनुषच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच धनुष रांझा बनून आपल्यासमोर येणार आहे. धनुषने नुकताच आपला पहिला हिंदी सिनेमा साईन केला असून या सिनेमाचं नाव रांझा असणार आहे.
 
या सिनेमातील मुख्य भूमिका धनुष करतो आहे. मात्र धनुषचा हा पहिलाच हिंदी सिनेमा असला तरी भाषेचा कुठलाही अडथळा आपल्याला येणार नाही असं धनुषने स्पष्ट केलं आहे. संस्कृती समजून घेतली की बरोबर आपलं काम चोख होतं असं धनुषला वाटतं. त्यामुळे या सिनेमाबद्दल धनुष खूपच एक्साईटेड आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन तनू वेड्स मनू या सिनेमाचे दिग्दर्शक आनंद राय करणार आहेत.
 
ही एक प्रेमकथा असल्यामुळे आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमातून धनुष एक रोमॅन्टिक हिरो म्हणून आपल्यासमोर येणार आहे. मात्र या सिनेमात हिरोईन कोण असणार हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे. एकूणच साऊथचा हा सुपरस्टार बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि जसं एका गाण्यामुळे धनुष स्टार झाला तसंच पहिल्या हिंदी सिनेमामुळे धनुष यशाचं शिवधनुष्य आणखी चमकवण्यास यशस्वी होतो का हे लवकरच कळेल.
 
 

First Published: Wednesday, January 25, 2012, 17:39


comments powered by Disqus