Last Updated: Wednesday, October 26, 2011, 07:10
झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वांत आवडते नेते आहेत. त्यांनी माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम केलं, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी शिवसेनाप्रमुखांविषयी आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, दिवाळीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरील वाढता ताण पाहता सण हे संकट वाटू नये, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची सुरुवात करणार्या करवीरनगरीतील गणेशोत्सव मंडळांचा यथोचित सत्कार कार्यक्रमाप्रसंगी नाना बोलत होते.
याप्रसंगी अभिनेते नाना पाटेकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख हे आपले सर्वांत आवडते नेते असून त्यांनी मला भरभरून दिले. त्यांनी मला सांगू शकत नाही एवढं भरभरून प्रेम दिलं, प्रचंड दिलं. त्यामुळे मीही त्यांच्यावर जिवापाड प्रेम करतोय.
First Published: Wednesday, October 26, 2011, 07:10