Last Updated: Saturday, October 29, 2011, 05:21
झी २४ तास वेब टीम, लंडनकरीना कपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. बॉलिवूडची लाडकी बेबो आता झळकलीय ती ब्लॅक पूलच्या वॅक्स म्युझियम मध्ये.
लंडनच्या मादाम तुसा म्युझिअम ऐवजी करीनाचा पुतळ्याचं ब्लॅक पूलच्या म्युझिअमध्ये अनावरण झालं. यावेळी करीनानं स्वत: हा पुतळा पहिल्यांदाच पाहिला. ऐश्वर्या राय नंतर हा मान मिळवणारी करीना ही बॉलिवूडची दुसरी अभिनेत्री आहे.
मादाम तुसा संग्रहालयात पुतळा बसवण्यात आल्यामुळे करीना फारच आनंदी आहे. करीना कपूरचा मेणाचा पुतळा बनवण्यासाठी सुमारे चार महिने लागले.
मादाम तुसा संग्रहालयात बॉलिवूडच्या अनेक स्टार्सचे पुतळे आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, ऋतिक रोशन, शाहरुख खान आणि सलमान खान यांचे मेणाचे पुतळे आहेत.
त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला आहे. आता यामध्ये करीनाच्या पुतळ्याचाही समावेश झाला आहे.
First Published: Saturday, October 29, 2011, 05:21