Last Updated: Thursday, February 2, 2012, 15:16
www.24taas.com 
डर्टी पिक्चरमध्ये बोल्ड भूमिका साकारल्यानंतर आता विद्या बालन आणखीनच डर्टी होताना दिसणार आहे. विद्या बालन. डर्टी पिक्चरमध्ये विद्याने सिल्क स्मिताची भूमिका साकारुन आपणही बोल्ड भूमिका करु शकतो हे बॉलिवूडला दाखवून दिलं. तसं पाहता, आजवरच्या करिअरमध्ये विद्याने खऱ्या अर्थाने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. परिणीतामधून विद्याचं सोज्वळ रुप समोर आलं.
घरंदाज स्त्रीची व्यक्तिरेखा विद्याने या सिनेमात साकारली होती. तर अगदी विरुद्ध भूमिकेत विद्याचं दर्शन घडलं तर ते इश्किया सिनेमातून. तर डर्टी पिक्चर या सिनेमातून विद्याचं बोल्ड रुप समोर आलं. सिल्क स्मिताची भूमिका विद्याने उत्कृष्टरित्या साकारली. आणि प्रेक्षकांसह बॉलिवूडनेही विद्याचं तोंडभरुन कौतुक केलं. आणि अशीही बोल्ड विद्या लवकरच आणखी बोल्ड रुपातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
विधु विनोद चोप्रा यांच्या फेरारी की सवारी या सिनेमात विद्या साकारणार आहे आयटम गर्ल. खरंतर डर्टी पिक्चरमध्ये विद्याने सिल्क स्मिता या आयटम गर्लचीच व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र, आता विद्या खऱ्या अर्थाने आयटम गर्ल होणार आहे. एकूणंच काय तर डर्टी पिक्चरमधल्या सिल्क स्मिताच्या भूमिकेनंतर आता विद्याचाही आयटम गर्ल म्हणून बॉलिवूडचे निर्माते विचार करायला लागलेत हेच खरं.
First Published: Thursday, February 2, 2012, 15:16