थप्पड प्रकरणाचा मुलांवर परिणाम- किंग खान - Marathi News 24taas.com

थप्पड प्रकरणाचा मुलांवर परिणाम- किंग खान

www.24taas.com, मुंबई
 
शाहरुख खान आणि दिग्दर्शक शिरीष कुंडर यांच्यात झालेल्या वाद त्याच्या चिंतेचे कारण बनलं आहे. शाहरुखने अद्याप या वादावर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही आणि त्याबाबत प्रश्न विचारले असता त्याचं उत्तर देण्याचे त्याने टाळलं आहे.
 
कोलकाता इथे बुधवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना किंग खानने सफाईने बगल दिली. पण त्यानंतर मीडियात अनेक प्रकारच्या बातम्या येत असतात पण व्यक्तिगत जीवनात ढवळाढवळ करण्याची परवानगी कोणालाही असता काम नये असं किंग खान म्हणाला.
 
माझी मुलं मोठी होत आहेत आणि कोणतीही गैर गोष्ट त्यांनी टेलिव्हिजनवर बघायला मिळू नये असं आपल्याला वाटतं अशी टिपणी किंग खानने केली आहे. थप्पड प्रकरणाने आपल्या मुलांवर विपरीत परिणाम होऊ नये असं किंग खानला वाटत असावं हेच यावरुन दिसून येतं. अग्निपथच्या पार्टीत शाहरुख खाने फराह खानचा नवरा शिरीष कुंडरला मारहाण केली. शिरीष कुंडरने ट्विटवर रा-वन या किंग खानच्या सिनेमाची टिंगल उडवली होती. पण या घटनेनंतर किंग खानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिरीष कुंडरने एफआयआर दाखल न करता आपसात तडजोडीने हे भांडण मिटवलं.
 
 

First Published: Thursday, February 2, 2012, 16:08


comments powered by Disqus