आमीर ठरला शाहरुखपेक्षा सरस ! - Marathi News 24taas.com

आमीर ठरला शाहरुखपेक्षा सरस !

www.24taas.com, मुंबई
 
शाहरुख खान आणि आमीर खानमधलं ‘स्टारवॉर’ जूनंच आणि आता पुन्हा एकदा ‘तलाश’ सिनेमाच्या निमित्ताने आमीरने शाहरुख खानला झटका दिला आहे.
 
आमीर खानच्या तलाशा सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या सिनेमातील आमीरचा लूक, राणी मुखर्जी आणि करीना कपूरसारख्या अभिनेत्री यामुळे या सिनेमाची खूपच चर्चा होत आहे. आमीरचा सिनेमा बॉक्सऑफिसवर येत आहे म्हटल्यावर सिनेरसिकांच्या नजरा या सिनेमाकडे लागलेल्याच असतात. आणि हा सिनेमादेखील हिट होईल अशी चर्चा इंडस्ट्रीमध्येआहे.
 
त्यामुळेच आमीरचा हा सिनेमा ९० कोटी रुपयांना विकला गेला असल्याचं बोललं जात आहे. मात्र आमीरने फक्त कलेक्शनमध्ये बाजी मारली नाही तर एकाच दगडातून दोन पक्षी मारले आहेत. कारण एकीकडे या सिनेमासाठी आमीरला घसघशीत रक्कम मिळाली तर दुसरीकडे आमीरने शाहरुखवरदेखिल मात दिली. कारण शाहरुख खानचा रा-वन सिनेमा ८० कोटी रुपयांना विकला गेला होता आणि आमीरचा तलाश ९० कोटी रुपयांना विकला गेला आहे. आता पुन्हा एकदा आमीरने शाहरुखला मागे टाकलं हे नक्की. शेवटी म्हणतात ना जो जिता वही सिकंदर...
 

First Published: Thursday, February 2, 2012, 18:46


comments powered by Disqus