बिच्चारा सलमान ! - Marathi News 24taas.com

बिच्चारा सलमान !

www.24taas.com, मुंबई
 
शाहरुख खान आणि शिरीष कुंदर यांच्यामध्ये समेट झाली असली तरी या कॉन्ट्रवर्सीबद्दल चर्चा होणं हे अजून काही थांबत नाही.या पार्टीनंतर सलमान खानने शिरीष कुंदरला फोनकरून पार्टीबद्दल बित्तंबातमी जाणून घेतल्याचं बोललं जातं होतं.
 
मात्र आपण शिरीषला फोन केला नसल्याचं स्वत: सलमान खानने स्पष्ट केलं आहे. मला उगीचच या कॉन्ट्रवर्सीमध्ये खेचण्यात येत आहे असंही सलमानचं म्हणणं आहे. सलमानचं नाव या कॉन्ट्रवर्सीमध्ये घेण्यात येत असल्यामुळे सलमानचे वडील सलीम खानही नाराज असल्याचं बोललं जात आहे.
 
जरा काही झालं की त्यात सलमानचं नाव घेतलं जातं. बिच्चारा सलमान तर परदेशी शूटिंग करतोय...

First Published: Thursday, February 2, 2012, 18:58


comments powered by Disqus