रितेश -जेनेलिय़ा आज होणार विवाहबद्ध - Marathi News 24taas.com

रितेश -जेनेलिय़ा आज होणार विवाहबद्ध

www.24taas.com , मुंबई
 
 
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचे  आज शुभमंगल होत  आहे. रितेश आणि जेनेलियाचे प्रेमप्रकरणाची दशकपूर्ती झाली. परीकथे सम असलेल्या प्रेमप्रकरणाची परिणीती विवाहात होणार आहे. आज १२ वाजण्याच्या सुमारा मुंबईत घोड्यावरून जोरदार मिरवणूक काढण्यात आली.
 
 
रितेश देशमुख आणि जेनेलिय़ा डिसुझा हे बॉलिवूडचं कपल आज मुंबईत विवाहबद्ध होत आहेत. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये रितेश आणि जेनेलियाचा लग्नसोहळा पार पडणारेय. हा लग्नसोहळा मराठी पद्धतीनं पार पडेल. यो सोहळ्साठी रितेशने पांढ-या रंगाचा शेरवानी, लाल रंगाचा फेटा परिधान केलाय.
 
 
‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाद्वारे दोघांनीही सिनेसृष्टी पदार्पण केलं होतं. रितेश आणि जेनेलियाचा विवाह सोहळा चार दिवस चालणार आहे. मेहंदी सोहळा तीन फेब्रुवारीला तर संगीत चार तारखेला होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी उपनगरातील दोन पंचतारांकित हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. देशमुख आणि डिसूजा कुटुंबियांना या विवाह सोहळ्याचा फार गाजावाजा करायचा नव्हता. मात्र, लग्नाआधी घोड्यावरून मिरवणुक काढण्यात आली.
 
 
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांमुळे निमंत्रितांची यादी मोठी  असणार याच शंका नाही.  आजच्या सोहळ्याला आनेक दिग्गज  उपस्थित राहणार आहेत. यात शरद पवार यांचा समावेश आहे. या विवाहसोहळ्याला देशमुख आणि जेनेलिया परिवाराच्या जवळच्या मंडळींना आमंत्रित करण्यात आलंय. लग्नाचा स्वागत समारंभ उद्या पार पडणारेय. या शाही विवाह सोहळ्याबद्दल बॉलिवूडमध्येही उत्सुकता वाढली आहे.
 

 
 

First Published: Friday, February 3, 2012, 12:51


comments powered by Disqus