करिनाच्या 'चोरून' काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन ! - Marathi News 24taas.com

करिनाच्या 'चोरून' काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन !

www.24taas.com, मुंबई
 
अभिनेत्री करिना कपूरचा फॅन आणि सहकलाकार इम्रान खानने करिनाच्या काही खास फोटोंचं प्रदर्शन भरवलं आहे. हे फोटो इम्रानने ‘एक मै और एक तू’च्या शुटींगदरम्यान चोरून काढले होते. हे प्रदर्शन ३ फेब्रुवारीपासून वर्सोव्याच्या सिनेमॅक्स आर्ट गॅलेरीमध्ये आयोजित करण्यात आलं आहे.
 
इम्रान करिनाचा डायहार्ड फॅन असून ही गोष्ट कधीच त्याने लपवली नाही. ‘एक मै और एक तू’च्या शुटींगच्यावेळी इम्रानने बऱ्याचवेळा आपल्या या लाडक्या अभिनेत्रीचे तिच्या नकळत फोटो काढले. यासंदर्भात इम्रान म्हणाला, “मी आत्तापर्यंत जेवढ्या अभिनेत्रींबरोबर काम केलंय, त्या सगळ्यांमध्ये सर्वात सुंदर कुठली अभिनेत्री असेल, तर ती करिना. तिची पहिली फिल्म ‘रेफ्युजी पाहिल्यापासून मी तिच्यासाठी वेडा झालो होतो.” इम्रानने मान्य केलं आहे की लहानपणापासून इम्रानला करिना आवडते.
 
इम्रान म्हणाला, “मी कधीच माझ्या भावना व्यक्त करू शकलो नाही. मी नेहमीच शांत राहायचो आणि जेव्हा आम्ही या सिनेमासाठी एकत्र काम करणं सुरू केलं, तेव्हा मला करिना प्रत्यक्षात व्यक्ती म्हणून कशी आहे ते समजलं. जेव्हा ती शुटींग करत असायची, तेव्हा मी हळूच चोरून तिचे फोटो काढले.” करण जोहरच्या आगामी सिनेमात इम्रान-करिनाची जोडी हा सध्या बी- टाऊनच्या चर्चेचा विषय बनली आहे.
 
 

First Published: Friday, February 3, 2012, 21:21


comments powered by Disqus