करिना मानते आमीरला बॉलिवूडचा 'उस्ताद' - Marathi News 24taas.com

करिना मानते आमीरला बॉलिवूडचा 'उस्ताद'

www.24taas.com, मुंबई
 
करिना कपूर ही सध्याची आघाडी अभिनेत्री. सध्याच्या सगळ्याच टॉपच्या अभिनेत्यांबरोबर तिने काम केलं आहे. याचबरोबर सगळ्या खान मंडळींबरोबर ती काम करत आहे. पण, करिना या सगळ्या अभिनेत्यांमध्ये महान मानते ते आमीर खानला!
 
करिनाच्या मते अमीर खानचं काम अफलातून आहे. तो हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा उस्ताद आहे. ‘३ इडियट्स’ मध्ये करिनाने पहिल्यांदाच आमीर खानसोबत काम केलं होतं. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला होता. जूनमध्ये येत असणाऱ्या ‘तलाश’ या सिनेमातही करिना आमीरसोबत दिसणार आहे. इम्रान खान तर अत्ता कुठे सुरूवात करतोय. इम्रानबरोबर काम करण्यातही खूप मजा येते. त्याच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी मिळावी अशी करिनाची इच्छा आहे.
 
करिनाचे सध्या इम्रान खानसोबत ‘एक मै और एक तू’ आणि सैफ अली खानसोबतचा ‘एजंट विनोद’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. तरीही ती एजंट विनोदच्या प्रमोशनमध्ये कुठेही दिसत नाही. याबद्दल विचारलं असता ती म्हणाली की यावेळी ‘एक मै और एक तू हा सिनेमा मला महत्त्वाचा आहे.

First Published: Saturday, February 4, 2012, 21:22


comments powered by Disqus