Last Updated: Monday, October 31, 2011, 05:58
झी २४ तास वेब टीम, पतौडीअभिनेता सैफ अली खान आता नवाब सैफ अली खान पतौडी म्हणून ओळखला जाणार आहे. हरियाणामध्ये पतौडी गावात शानदार पगडी समारंभ आज थाटात पार पडणार आहे.सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्या निधनानंतर नवाब हे पद सैफला मिळणार आहे. हरियाणामध्ये पतौडी गावात इब्राहिम पॅलेसमध्ये या शाही सोहळ्याचे आयोजन केलं गेलं आहे. पतौडीमध्ये या शाही सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. तब्बल ५२ गावांतील जनता यावेळी हजर असेल. सैफला तीन पगड्या बांधण्यात येतील. हरियाणाच्या जनतेसाठी हा अतिशय मानाचा समजला जाणारा सोहळा असेल.
मात्र "मी स्वत: भारतीय लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. नवाब हे पद आनंदाने स्विकारणार असलो तरी, एक पारंपारिक सोहळा म्हणूनच मी या सोहळ्याकडे पाहतो." असं सैफ अली खानचं म्हणणं आहे.
First Published: Monday, October 31, 2011, 05:58