जळगावातल्या तरुणीवर हरियाणात गँगरेप!

Last Updated: Monday, May 5, 2014, 13:09

हरियाणाच्या कॅथल जिल्ह्यातील क्षेत्र पुंडरी या भागात रविवारी सकाळी एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत सापडली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तरुणीला हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. यावेळी, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलंय. ही तरुणी मूळची महाराष्ट्रातली असल्याचं समोर येतंय.

महिला मंत्र्यांवर प्रचार सभेत दगडफेक

Last Updated: Thursday, March 20, 2014, 12:32

हरियाणाच्या आरोग्यमंत्री किरण चौधरी यांच्यावर नारनौल येथील प्रचार सभेत दडगफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्यात. त्यांना तात्काळ गुरवागमधील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हरियाणाचा क्रिकेटर संदीप सिंहचा अपघाती मृत्यू

Last Updated: Saturday, February 8, 2014, 15:30

हरियाणाचा प्रथम श्रेणीचा २५ वर्षीय क्रिकेटर संदीप सिंह याचा शुक्रवारी एका अपघातात मृत्यू झाला. हरियाणातील मुंडाल इथं ही दु्र्घटना घडली. ट्रॅक्टरखाली चिरडला गेल्यानं संदीपचा मृत्यू झाला.

हरियाणात मुख्यमंत्र्यांना तरुणाने थोबडले

Last Updated: Sunday, February 2, 2014, 23:18

एका तरुणानं भर गर्दीत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या कानशिलात लगावली. पानिपत इथं विविध उद्घाटन कार्यक्रमांसाठी हुडा आले होते. त्यावेळी एका ओपन जिपमधून ते जनतेला अभिवादन करत जात होते. त्याच वेळी कमल मुखिजा नावाचा एक युवक सुरक्षाचक्र भेदून त्यांच्याजवळ आला आणि त्यानं हुडा यांच्या श्रीमुखात भडकवली.

बायकोनं नवऱ्याला छतावरून फेकलं!

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 16:00

अवैध संबंधासाठी एका पत्नीनं स्वत:च्या पतीला जीवे मारण्याच्या उद्देशानं छतावरून फेकलं. यामध्ये पती थोडक्यात बचावला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पतीनं पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी पत्नी, तिचा भाऊ, आई आणि तिचा प्रियकरांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडिओ : पोलीस स्टेशनमध्ये डिस्को...

Last Updated: Monday, December 30, 2013, 12:03

पोलीस स्टेशनमध्ये डिस्को... तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. पोलीस स्टेशनमध्ये डीस्कोचा प्रकार घडलाय हरियाणामध्ये…

नवऱ्याला कॉटला बांधून महिलेवर अत्याचार

Last Updated: Sunday, December 29, 2013, 17:09

हरियाणा राज्यातील रेवाडीपासून काही अंतरावर असलेल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हा प्रकार ऐकल्यावर अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही. दहा जणांच्या टोळीनं रेवाडी शहराच्या बाहेर राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

भेटा भारताच्या GOOGLE BOY कौटिल्यला!

Last Updated: Sunday, September 22, 2013, 16:13

हरियाणातल्या करनाल जिल्ह्यातल्या कोहंड गावचा सहा वर्षाचा कौटिल्य अद्वितिय बुद्धीमत्तेचा धनी आहे. कौटिल्य देश-परदेशातल्या भूगोल आणि सामान्य ज्ञानाविषयी इतकी भराभर माहिती देतो की ऐकणाराच थक्क होऊन जाईल.

हॉरर किलिंग... प्रेमी युगुलाची कुटुंबीयांकडूनच क्रूर हत्या!

Last Updated: Thursday, September 19, 2013, 10:05

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात पुन्हा एकदा हॉरर किलिंगचं प्रकरण समोर आलंय... पुन्हा एकदा एका तरुणीला आणि एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.

नरेंद्र मोदींचा हरियाणातून `श्रीगणेशा`

Last Updated: Sunday, September 15, 2013, 15:00

भारतीय जनता पार्टीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांची हरियाणाच्या रेवार इथं जाहिर सभा होतेय.

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आईची हत्या

Last Updated: Thursday, August 29, 2013, 14:55

देशात सामूहिक बलात्काराच्या अनेक घटना सध्या पुढं येत आहेत. महिलांच्या बाबतीत नेहमीच वादात येणाऱ्या हरियाणा राज्यातल्या चोटीकलासी गावात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. मात्र एवढ्यावरच न थांबता मुलीच्या आईचीही नराधमांनी हत्या केली. हे कृत्य करणारे होते त्याच गावातल्या प्रभावशाली घराण्यांतील मुलं.

`सैनिक मरतात, नेत्यांना मात्र चाड नाही`

Last Updated: Saturday, August 10, 2013, 12:48

‘केवळ लज्जास्पद! सीमेवर आपले सैनिक मरत आहेत पण ढिम्म नेत्यांना त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. जे देशाच्या शहिदांचा सन्मान करू शकत नाहीत ते कधीही पुढे जाऊ शकत नाहीत’

पोलीस बनला ग्राहक; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Last Updated: Friday, August 9, 2013, 18:37

बनावट ग्राहक पाठवून हरियाणाच्या फरिदाबाद सेन्ट्रल पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय.

खासदारकी १०० कोटीत, काँग्रेस नेत्याचा बॉम्बगोळा

Last Updated: Monday, July 29, 2013, 20:00

राजकारणात काय चालतं, याचे दाखले निवडणून आलेले लोकप्रतिनिधी देत आहे. खासदारकीच्या निवडणुकीत आपल्याला आठ कोटी रुपये खर्च करावे लागल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. त्यावरून बरेच वादळ उठले. आता तर केंद्रात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसच्याच नेत्यांने खासदारकी १०० कोटी रूपयात मिळते, अशी धक्कादायक कबुली दिली.

पत्नी बेपत्ता; विरहात मंत्र्यानं सोडला प्राण

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 13:53

हरियाणाचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तेजेंद्र पाल मान यांचं रविवारी रात्री उशीरा दिल्लीमध्ये निधन झालंय.

तुरुंगात 'बिस्किटं' भाजणार अजय चौटाला...

Last Updated: Saturday, January 26, 2013, 12:55

हरियाणातील `शिक्षक भरती घोटाला` प्रकरणात दहा वर्षांच्या कारावसाची शिक्षा ठोठावण्यात आलेला आमदार अजय चौटाला याला तुरुंगात बिस्किटे बनविण्याच्या बेकरीत काम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

ओमप्रकाश, अजय चौटाला यांना १० वर्षांची शिक्षा

Last Updated: Tuesday, January 22, 2013, 12:26

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला यांना शिक्षक भरती घोटाळ्यात दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

शिक्षक भरती घोटाळा : ओम प्रकाश चौटाला दोषी

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 12:49

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला याच्यासह ५३ जणांना शिक्षक भरती घोट्याळ दोषी ठरविण्यात आले आहे.

मी चुकलो हे कोर्टात सिद्ध करा; खेमकांनी दिलं आव्हान

Last Updated: Thursday, October 18, 2012, 13:44

रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्यामधल्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या अशोक खेमका आणि हरियाणा सरकारमध्ये चांगलीच जुंपलीय. ‘मी दिलेले आदेश चुकीचे असतील तर कोर्टात जा’ असं म्हणत अशोक खेमका ठामपणे हरियाणा सरकारसमोर उभे ठाकलेत.

`बलात्कार नाही.. मुली मर्जीनं ठेवतात शारीरिक संबंध`

Last Updated: Friday, October 12, 2012, 12:03

हरियाणामध्ये सामूहिक बलात्काराच्या वाढत्या घटनांवर इथल्या काँग्रेसच्या एका प्रवक्त्यानं, मुलींवर बलात्कार होत नाही तर मुली आपल्या मर्जीनं शारीरिक संबंध ठेवतात, असं वादग्रस्त विधान केलंय.

रेप टाळण्यासाठी १५ व्या वर्षीच लग्न योग्य – चौटाला

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 16:10

हरियाणात गेल्या महिनाभरात १३ बलात्काराच्या घटना घडल्याने चिंता वक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी धक्कादायक विधान केले आहे. बलात्कार रोखण्यासाठी वयात आलेल्या मुलींची लग्न लावून द्या, असे चौटाला म्हणालेत.

लव, राजनिती और धोका

Last Updated: Tuesday, August 7, 2012, 18:41

दोन वर्षापूर्वी प्रसिद्धी झोतात असलेल्या फिजाचा मृत्यू झालाय... तिच्याशी लग्न करण्यासाठी एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांने चक्क धर्मांतर केलं होतं...त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा झाली होती...पण फिजाच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत..

एअरहोस्टेसची आत्महत्या; मंत्र्याचा राजीनामा

Last Updated: Monday, August 6, 2012, 13:56

एअरहोस्टेस गीतिका शर्माच्या आत्महत्येप्रकरणी हरियाणा सरकारचे मंत्री गोपाल कांडा यांनी राजीनामा दिलाय.. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कांडा यांना अटक होण्याची शक्यता आहे.

अनुराधा बाली ऊर्फ फिजाचा संशयास्पद मृत्यू

Last Updated: Monday, August 6, 2012, 14:01

वादग्रस्त अनुराधा बाली ऊर्फ फिजाचा मोहालीच्या राहत्या घरी दुर्दैवी अंत झालाय. फिजाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आलाय. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता.

ऑलिम्पिक खेळाडूंसाठी सडलेला ज्यूस...

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 17:50

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या आणि सध्या लंडन ऑलिम्पिकची तयारी करत असलेल्या भारतीय कुस्तीपटूंना आपल्या भारतातच मिळालाय सडलेल्या फळांचा ज्यूस...

हरियाणात विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार

Last Updated: Saturday, May 19, 2012, 10:27

हरियाणामधील सोनिपत जवळील भगत फूल सिंग महिला विश्वविद्यालयातील विद्यार्थिनीवर चार तरुणांनी समुहिक बलात्कार केला आहे. ही मुलगी कॉलेजमध्ये विधीशास्त्राच्या प्रथम वर्षाला शिकत होती. कॉलेजजवळील हॉस्टेलवरच ती राहात होती.

हरियाणात महिलांना जिन्स, टी शर्टवर बंदी

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 15:05

हरियाणा सरकारने महिलांसाठी नवा फतवा काढला आहे. महिलांना जिन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी करण्यात आली आहे. जर या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे महिलांना आता सावधनता बाळगावी लागणार आहे.

नानाची शूटिंग रेंजवर बॅटींग, अधिकृत करा बेटींग

Last Updated: Thursday, March 29, 2012, 14:07

हरियाणातील गुडगाव येथे सीआरपीएफ कादरपूर शूटिंग रेंजवर १०० मीटर रायफल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेला अभिनेता नाना पाटेकर यांने सेट्टीबाजीवर बॅटींग केली. नानाने गुगली टाकत सांगितले, सरकराने सट्टेबाजी रोखण्यासाठी ती अधिकृत केलेली बरी.

'नवाब' सैफ अली खान पतौडी

Last Updated: Monday, October 31, 2011, 05:58

अभिनेता सैफ अली खान आता नवाब सैफ अली खान पतौडी म्हणून ओळखला जाणार आहे. हरियाणामध्ये पतौडी गावात शानदार पगडी समारंभ आज थाटात पार पडणार आहे.हरियाणामध्ये पतौडी गावात इब्राहिम पॅलेसमध्ये या शाही सोहळ्याचे आयोजन केलं गेलं आहे.