उत्तर प्रदेश निवडणुका अन् शाहरुखचे कनेक्शन - Marathi News 24taas.com

उत्तर प्रदेश निवडणुका अन् शाहरुखचे कनेक्शन

www.24taas.com, मुबई
उत्तर प्रदेशच्या निवडणुका, शाहरुख खान, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री मायावती यांचे एकमेकांशी कनेक्शन काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही त्याला नक्कीच वेड्यात काढाल. पण शाहरुख खान आणि उत्तर प्रदेश निवडणुकांचे कनेक्शन आहे. किंग खानला त्याच्या एका मित्राने एसएमएस पाठवला आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या संदर्भात त्याला दिल तो पागल है ची आठवण झाल्याचं कळवलं.
 
यावर एसआरकेने ट्विट केलं आहे की दिल तो पागल है मध्ये राहुल मायच्या मागे वेडा झाला आहे आणि त्यात एक गाणं आहे हाथी जैसी सुंड चक धुम धुम. आता जर तुमचं डोकं भणाणून उठलं असेल तरी कनेक्शन नेमकं काय आहे त्यासाठी पुढे वाचा. दिल तो पागल है मध्ये शाहरुख खानने राहुलची तर माधुरी दिक्षीतने मायाची भूमिका केली आहे.
 
सिनेमात राहुल मायाच्या मागे हात धुवून लागला आहे. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्येही राहुल मायावतींच्या मागे हात धुवून लागला आहे पण वेगळ्या अर्थाने. आता दिल तो पागले है मधल्या गाण्याच्या बाबतीत योगायोग असा आहे की घोडे जैसी चाल हाथी जैसी दुम आणि मायावतींच्या बसपाचे चिन्ह आहे हत्ती. आता बघा आहे कि नाही कनेक्शन.
 
 

First Published: Tuesday, February 7, 2012, 12:53


comments powered by Disqus