Last Updated: Tuesday, February 7, 2012, 16:52
www.24taas.com, मुंबई गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर प्रेग्नंट असल्याची चर्चा ज्याच्या त्याच्या तोंडी होती. बेबो एअरपोर्टवरून येत असताना आपलं पुढे आलेलं पोट जाणून-बुजून लपवत असल्याचा फोटोही सगळीकडे प्रसिद्ध झाला होता.
पण, ही बातमी म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.एका दैनिकाशी बोलताना करीनाच्या जवळच्याच एका व्यक्तिने ही गोष्ट स्पष्ट केली, “नाही... करिना प्रेग्नंट नाही. अचानक एका फोटोवरून वाटेल ते तर्क लढवले गेले. या अफवांनी करीनाला काहीही फरक पडलेला नाही. तिचं संपूर्ण लक्ष तिच्या कामावर आहे. ”करिनाचा एअरपोर्टवर काढलेला फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाला आणि करीनाच्या लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याच्या बातमीला ऊत आला.
“२० फेब्रुवारीपासून करीना मधुर भंडारकरच्या हिरॉइन या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी असेल. २०-२५ दिवस ते शुटींग सुरू असेल. आणि शुटींगच्या डेट्स करीनाने मधुरला निश्चित सांगितल्या आहेत. करीना जर प्रेग्नंट असती तर ती सिनेमाचं शुटींग करू शकली असती का?” असं करीनाच्याच दुसऱ्या एका सूत्राने सांगितलं आहे. तेव्हा एक गोष्ट नक्की की झीरो फिगर करीनाचं पोट आत्ता कदाचित वाढलं असेल. पण, ती प्रेग्नंट मात्र नक्की नाही.
First Published: Tuesday, February 7, 2012, 16:52