Last Updated: Thursday, February 9, 2012, 19:43
www.24taas.com, मुंबई 
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर येत्या ११ तारखेला पोटाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. लिलावती रुग्णालयात त्याचं चेकअप करण्यात आलं. 'कुली' सिनेमादरम्यान पोटात झालेल्या दुखापतीमुळेच ही शस्त्रक्रीया करावी लागणार असल्याचं अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर म्हटलं आहे.
कुली सिनेमामध्ये एका मारामारीच्या सिनमध्ये फाईट चुकवण्यासाठी अमिताभ यांना टेबलाचा पत्रा पोटाला लागल्याने त्यांच्या आतडीला गंभीर दुखापत झाली होती. त्यातून बिग बी बऱ्यापैकी सावरले मात्र अधूनमधून त्यांना पोटाची व्याधी त्रास देत असते.
याआधीही 'बिग बी' वर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा पोटाचा त्रास उद्भवल्यानेच शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसंच ही शस्त्रक्रिया गंभीर स्वरुपाची नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. असंही अमिताभ यांनी ब्लॉगवर स्पष्ट केलं आहे. येत्या ११ तारखेला सकाळी अमिताभ यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
First Published: Thursday, February 9, 2012, 19:43