Last Updated: Monday, February 13, 2012, 13:46
www.24taas.com, मुंबई बिग बी यांना आज रुग्णालयातुन घरी सोडण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. अमिताभ बच्चन यांना शनिवारी मुंबईतील अंधेरीच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. बिग बी यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा यासाठी देशभरातील लक्षावधी चाहते प्रार्थना करत होते.
बिग बी यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अभिषेक बच्चन याच्या मते अमिताभ बच्चन यांना १९८२ साली कुली सिनेमाच्या शुटिंगच्या वेळेस झालेली जीवघेणी दुखापतीमुळे आजही त्यांच्या प्रकृतीच्या गंभीर तक्रारी सुरु आहेत आणि दुखणं डोकं वर काढत असतं.
बिग बी यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतर वेदना होत असल्याचं टविट केलं होतं. वेदना होतं असली तरी त्याशिवाय आयुष्यात काहीच चांगलं साध्य होत नसल्याचं अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
First Published: Monday, February 13, 2012, 13:46