एजंट विनोद १०० कोटींचा टप्पा पार करेल- सैफ - Marathi News 24taas.com

एजंट विनोद १०० कोटींचा टप्पा पार करेल- सैफ

www.24taas.com, लंडन
 
एजंट विनोद या सिनेमात बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याची क्षमता असल्याचं सैफ अली खानचं म्हणणं आहे. दिनेश विजनसोबत सैफने एजंट विनोदची निर्मिती केली आहे. हा सिनेमा मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार असून तो सहज १०० कोटी रुपयांची कमाई करेल असा विश्वास सैफने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. एजंट विनोदवर १९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून १९ महिन्यात तो पूर्ण करण्यात आला.
 
जगभरात ३५०० स्क्रिनवर एकाच वेळी एजंट विनोद रिलीज करण्यात येईल. सैफने या सिनेमात लीड रोल केला आहे. भारतीय प्रेक्षकाची आवडनिवड लक्षात घेऊन एजंट विनोदची निर्मिती करण्यात आल्याचं सैफ म्हणाला. एजंट विनोद वास्तवादी असला तरी तो लार्जर दॅन लाईफ रेखाटणारा सिनेमा आहे. एजंट विनोदचे शुटिंग लॅटविया, मोरोक्को, रशिया, उझबेकिस्तान, युनायटेड किंग्डम अशा जगभरातल्या १२ देशात करण्यात आलं आहे. दिल चाहता है, परिणिता आणि ओमकारा या सिनेमातील भूमिकांमुळे सैफने बॉलिवूडमध्ये आपला स्वत:चा ठसा उमटवला आहे.
 
सैफ एजंट विनोद सिनेमातील ऍक्शन सीनसाठी विएतनाममध्ये खास प्रशिक्षणासाठी गेला होता. एजंट विनोदचे दिग्दर्शन श्रीराम राघवनने तर संगीत दिग्दर्शन प्रीतम चक्रवर्तीने केलं आहे.
 
 

First Published: Monday, February 20, 2012, 21:18


comments powered by Disqus