Last Updated: Tuesday, February 21, 2012, 16:00
www.24taas.com, मुंबई स्टायलिश ऍक्शन फिल्म 'धूम'मध्ये आधी जॉन आब्रहम आणि नंतर हृतिक रोशन यांच्या खलनायकी भूमिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. या सिनेमाचा तिसरा भाग धूम ३ लवकरच येत आहे आणि त्यात व्हिलन साकारत आहे खुद्द आमिर खान!
पण, 'धूम'ची धूम एवढ्यावरच थांबली नाही. धूमचा चौथा सिक्वलही बनणार आहे. 'धूम-४'ची कथा नक्की झाली आहे. शेवटचा ड्राफ्ट तयार झाला की याचं शुटींग सुरू होणार आहे. मुख्य म्हणजे धूम-४मध्ये व्हिलनच्या रोलसाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध बॅड बॉय सलमान खानने होकार कळवला असल्याचं सांगण्यात येत आहे. “सलमान खानला अशाच एका स्टायलिश ऍक्शन फिल्ममध्ये काम करायची इच्छा होती. धूमचे निर्माते आदित्य चोप्रा यांनी सलमानशी या संदर्भात चर्चा केली. सलमाननेही सिनेमाचं स्क्रीप्ट ऐकून आपला होकार कळवला आहे. धूमचा शेवटचा ड्राफ्ट एकदा तयार झाला, की सिनेमाला सुरूवात होईल.” असं एका सूत्रातर्फे सांगण्यात आलं.
धूमच्या पाचव्या सिक्वलचीही तयारी सुरू झाली असून यामध्ये मुख्य भूमिकेसाठी शाहरुख खानचं नाव निश्चित केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. आमीर, सलमान आणि शाहरूखची वर्णी लागल्यावर आता असं दिसतंय की बहुतेक धूमची संपूर्ण सीरीजच खान मंडळींनी हायजॅक केली आहे.
First Published: Tuesday, February 21, 2012, 16:00