क्रिश २च्या सेकंड लीडसाठी तारांबळ - Marathi News 24taas.com

क्रिश २च्या सेकंड लीडसाठी तारांबळ

झी २४ तास वेब टीम, मुंबई
राकेश रोशनच्या क्रिश 2 सिनेमामध्ये प्रियांका चोप्रा आणि हृतिक रोशन मुख्य भूमिका साकारत असले तरी या सिनेमातील सेकंड लीडची कहाणी अगदी फिल्मी झाली आहे.
सेकंड लीडसाठी अभिनेत्रीची कास्टिंग करताना निर्माता-दिग्दर्शकांची चांगलीच तारांबळ होते.
त्यातही मुख्य भूमिकांची कास्टिंग केल्यानंतर सेकंड लीडची कास्टिंग करणं म्हणजे निर्मात्यांसाठी कर्मकठीण...बॉलिवूडमध्ये सेकंड लीडची भूमिका करण्यासाठी कोणीच सहज तयार होत नाही.
मुख्य भूमिकेसमोर आपण झाकोळलं जाऊ हिच भीती त्यांना असते आणि बॉलिवूडमध्ये भल्लाभल्या निर्माता-दिग्दर्शकांना याचा सामना करावा लागलाय. मग तो दिल तो पागल है सिनेमा असो किंवा कुछ कुछ होता है. या सिनेमामध्ये माधुरी दीक्षित आणि काजोल यासारख्या बिग स्टार अभिनेत्रींसमोर सेकंड लीड करण्यासाठी कोणीच तयार होत नव्हतं आणि सध्या राकेश रोशनच्या आगामी क्रिश 2 सिनेमाच्या बाबतीतही हेच दिसून येतं आहे.
या सिनेमामध्य़े प्रियांका चोप्रा लीड रोल करत असल्यामुळे सेकंड लीड करण्यासाठी कोणीच सहज तयार होत नाही. अगदी कतरिना कैफनेही सेकंड लीड करण्यास नकार दिला. मात्र ही यादी इथेच संपत नाही तर जॅकलिन फर्नांडिस, आणि चित्रंगदा सिंग यांनी देखील सेकंड लीड करण्यास आपली नापसंती दर्शवली. आणि याचं मुख्य कारण म्हणजे सेकंड लीडची भूमिका करताना आपली भूमिका मुख्य पात्रापुढे झाकोळली जाईल ही भीती सध्या या अभिनेत्रींना वाटतेय.
क्रिशच्या यशानंतर प्रियांका चोप्राचे रोशन कुटुंबाशी संबंध घनिष्ठ झालेत त्यामुळे प्रियांकापुढे आपल्या भूमिकेला योग्य न्याय मिळणार नाही. या अभिनेत्रींना ही असुरक्षितता वाटत असल्यामुळे या तिघींनीही या सिनेमातून काढता पाय घेतला आहे....मात्र ही भूमिका आता कंगना राणावत करत असल्याची चर्चा आहे....त्यामुळे कंगना प्रियांकाला टफ फाईट देण्यात यशस्वी होते का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल...तसं पाहिलं तर फॅशन सिनेमातील या दोघींच्या भूमिका या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी अशाच होत्या मात्र पडद्यावरील हे नाट्य आता वास्ववातही या दोघींमध्ये पाहायला मिळणार असंच वाटतंय... मात्र काहीही असो या निमित्ताने अभिनेत्रींच्या अस्तित्वाची लढाई पुन्हा एकदा समोर आली आहे...

First Published: Saturday, November 5, 2011, 10:54


comments powered by Disqus