Last Updated: Thursday, February 23, 2012, 21:15
www.24taas.com, मुंबई तमाशा या लोककलेला चौफुल्यापासून ते राजदरबारापर्यंत प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या तमाशासम्राज्ञी म्हणजेच विठाबाई नारायणगावकर. यांची हृदयस्पर्शी जीवनकहाणी आता रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. अभिनेत्री उर्मिला कानेटकर साकारतेय विठाबाईची भूमिका.
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित 'विठा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. उर्मिलासोबत उपेंद्र लिमये प्रमुख भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन करतायत पुंडलिक धुमाळ
तमाशासम्राज्ञी विठाबाईंच्या आव्हानात्मक जगण्याची कथा यात मांडण्यात आली आहे.रुपेरी पडद्यावर विठाबाईंची ही जीवनकहाणी लवकरच पाहायला मिळेल.
First Published: Thursday, February 23, 2012, 21:15