फ्रिडा 'देव'ला पावली - Marathi News 24taas.com

फ्रिडा 'देव'ला पावली

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
'स्लमडॉग मिलिनेअर'च्या चित्रीकरणा दरम्यान फ्रिडा पिंटो आणि देव पटेल एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांचा रोमान्स बहरला. आता या दोघांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. फ्रिडा आणि देव हे आता लॉस एंजेलिसमध्ये एकत्र राहु लागले आहेत. या दोघांनी लॉस एंजेलिसमध्ये दीड मिलियन डॉलर्स किंमतीचे घर भाड्याने घेतल्याचं वृत्त डेली मेलनं दिलं आहे. फ्रिडाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपण करिअरच्या तुलनेत नातेसंबंधाला अधिक प्राधान्य देणार नसल्याचं सांगतानाच या दोन्हींचा समतोल साधू असं म्हटलं होतं. सध्या करिअरवरच अधिक लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्याचं तिनं सूचित केलं.

First Published: Saturday, November 5, 2011, 16:52


comments powered by Disqus