सलमान-शाहरुख किती दूर? किती जवळ? - Marathi News 24taas.com

सलमान-शाहरुख किती दूर? किती जवळ?

www.24taas.com, मुंबई
 
सलमान आणि शाहरुख खान यांच्यात असलेलं शीतयुद्ध सगळ्यांना परिचयाचं आहेच. आता बॉलिवूडमधले हे दोन दिग्गज खान एकमेकांच्या शेजारी होणार आहेत. सलमान खानने शाहरुखच्या मन्नत या बंगल्याजवळ असलेल्या इमारतीत आलिशान फ्लॅट खरेदी केल्याचं वृत्त आहे. सलमान खानने मन्नत पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या द ऍड्रेस या २८ मजली बिल्डिंगमध्ये तीन मजल्यांचा आलिशान घर खरेदी केलं आहे.
 
सलमानने तब्बल ९७६३ फूट कार्पेट एरिया असलेलं ट्रिप्लेक्स विकत घेतलं आहे. या घराची किंमत आहे तब्बल ३२ कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीपोटीच सलमानने १ कोटी ६४ लाख रुपये मोजले आहेत. सध्या सलमान आपल्या आई वडिलांसोबत गॅलेक्सी अपार्टमेंटसमध्ये राहतो ते या नव्या घराच्या अगदी जवळ आहे. आता सलमान आणि शाहरुख या दोघांच्यात दुरावा असला तरी लवकरच ते शेजारी होणार असल्यामुळे त्यांच्यात जवळीक निर्माण होते का ते पाहायचं.

First Published: Sunday, February 26, 2012, 18:52


comments powered by Disqus