करणने प्रियांकाच्या जखमेवर मीठ चोळलं - Marathi News 24taas.com

करणने प्रियांकाच्या जखमेवर मीठ चोळलं

www.24taas.com, मुंबई
शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यात जवळीक निर्माण झाल्याच्या बातम्यांना मध्यंतरी उधाण आलं होतं. त्यामुळे गौरी खान कॅम्पने प्रियांकाला जवळजवळ वाळीतच टाकलं होतं. आता करण जोहरनेही प्रियांका चोप्राला झटका दिला आहे. करण जोहर आणि गौरी खान यांच्यात चांगली मैत्री आहे आणि त्यामुळेच त्याने आपल्या टॉक शोमधून प्रियांकाला डच्चू दिला आहे.
 
आता अशी बातमी आहे की करणने जाणून बुजून 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाच्या यादीतून प्रियांकाचे नाव कटाप केलं. करणने मुद्दाम अग्निपथ रिलीज होण्याची वाट पाहली आणि २०१२ सालच्या ब्लॉकबस्टरची हिरॉईन असलेल्या प्रियांकाला वगळत तिला अपमानित करण्याची संधी साधली. आता प्रियांका चोप्राची एसआरके कॅम्पमधून हकालपट्टी होणार का याची चर्चा आहे.

First Published: Sunday, February 26, 2012, 20:56


comments powered by Disqus