‘रॉकस्टार’ला मिळाली क्लिन चीट! - Marathi News 24taas.com

‘रॉकस्टार’ला मिळाली क्लिन चीट!

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
रणबीर कपूरचा आगामी चित्रपट रॉकस्टारला सेन्सॉर बोर्डाने क्लिन चीट दिली आहे. चित्रपटातील ‘फ्री तिबेट’ असे फलक अस्पष्ट केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने रॉकस्टारला य़ू/ए प्रमाणपत्र दिले आहे.
 
चित्रपटातील एका दृश्यात तिबेट संदर्भात काही फलक लिहिले होते. आता ते अस्पष्ट केले, त्यामुळे चित्रपटाला कात्री लावल्याशिवाय यू/ए प्रमाणपत्र मिळाल्याचे चित्रपटाच्या प्रवक्त्याने सांगितले.
 
इम्तियाज अली यांच्या या चित्रपटात गायक बनण्याची इच्छा असलेल्या एका छोट्या शहरातील तरुणाची काहाणी चित्तारली आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत अभिनेत्री नरगिस फाख्री दिसणार आहे. हा चित्रपट ११.११.११ ला प्रदर्शित होणार आहे.
 

First Published: Wednesday, November 9, 2011, 10:45


comments powered by Disqus