Last Updated: Tuesday, March 6, 2012, 20:21
www.24taas.com, मुंबई 
अग्निपथ सिनेमातल्या संजय दत्तने साकारलेल्या कांचा चीना या खलनायकाच्या दहशतीने लहान मुलं झोपेतून दचकून जागी होतात. आता अग्निपथच्या यशानंतर संजय दत्तने आपलं मानधन वाढवलं आहे आणि तो प्रत्येक सिनेमासाठी दहा कोटी रुपये घेत आहे. त्यामुळे आता निर्मात्यांचीही झोप उडाली आहे. अग्निपथच्या अभूतपूर्व यशाने संजय दत्तेने उत्तुंग भरारी मारली आहे. आणि आता शिखरावर पोहचल्यानंतर त्याने आपलं मानधन पाच कोटी रुपयांवरुन दुप्पटीने वाढवत दहा कोटी रुपायंवर नेलं आहे.
कांचा चीनाच्या यशाची पूरेपूर किंमत संजय दत्तने वसुल करायचं ठरवलं आहे. त्यामुळेच आता निर्मात्यांना त्याला घेताना दहावेळा विचार करावा लागणार आहे. संजय दत्तने भूमिकेत इतकी जान ओतली की त्याच्यामुळे अग्निपथने बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली. संजय दत्तने एका सिनेमासाठी दहा कोटी रुपये घेतलं तरी हरकत नाही पण कांचा चीना सारख्या दमदार भूमिका त्याने साकाराव्यात अशी त्याची चाहत्यांची नक्कीच अपेक्षा असणार.
First Published: Tuesday, March 6, 2012, 20:21