सट्टेमें कौन बनेगा करोडपती - Marathi News 24taas.com

सट्टेमें कौन बनेगा करोडपती

झी २४ तास वेब टीम, मुंबई
बुकी कशावर सट्टा लावतील त्याचा काही नेम नाही. ऐवशर्या राय बच्चन कोणत्या तारखेला मुलाला जन्म देणार यावर तब्बल १५० कोटींचा सट्टा खेळण्यात आला आहे. आणि ११/११/११ ही बुकींची फेव्हरीट तारिख आहे.
 
बिग बींनी या वर्षाच्या सुरवातीला ट्विटरवर ऐशवर्याला दिवस गेल्याची बातमी ट्विट केली आणि देशभरातल्या बुकींनी मुलगा होणार की मुलगी यावर सट्टा लावला. आता जशी तारिख जवळ येऊ लागली आहे तसा कोणत्या तारखेला मुल जन्माला येणार त्यावर सट्टा लावण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी बच्चन कुटुंबालाच बाळाचा जन्म ११ नोव्हेंबर व्हावा असं वाटत असल्याचं आणि त्यासाठी सिझरनच्या पर्यायाचा विचार करण्यात आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण अभिषेक आणि बिग बी यांनी या अफवांचे जोरदार खंडन केलं.
 
मुंबईच्या एका बुकीच्या मते ९ ते १४ नोव्हेंबर दरम्यानच्या तारखांवर सर्वाधिक बेटिंग झालं आहे आणि तब्बल १५० कोटी रुपयांचा सट्टा खेळण्यात आला आहे. दरम्यान ब्रॉडकास्ट असोशिएशन ऑफ एडिटर्स यांनी या बातमीच्या वृत्तांकना संदर्भात मार्गदर्शक तत्वं लागु केली आहेत आणि तिच्या प्रसारणावर बंदी घातली आहे.

First Published: Wednesday, November 9, 2011, 14:40


comments powered by Disqus