सलमान दिसणार श्रीकृष्णाच्या भूमिकेत - Marathi News 24taas.com

सलमान दिसणार श्रीकृष्णाच्या भूमिकेत

www.24taas.com, मुंबई
 
अक्षय कुमार आता सुटकेचा निश्वास टाकू शकतो. अक्षय आपल्या आगामी होम प्रॉडक्शनसाठी सलमान खान किंवा शाहरुख खान या दौघांपैकी एकाला घेऊ इच्छित होता. अखेर अक्षयला त्याच्या आगामी सिनेमा ओह माय गॉडसाठी लीड ऍक्टर गवसला आहे.
 
सलमान दबंग खानने अक्षयच्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करण्यास होकार दिला आहे. आता दबंग खान चक्का श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसणार आहे. दबंगचा सिकवेल शुट झाल्यानंतर अक्षयच्या सिनेमाच्या शुटिंगसाठी सलमानने डेटस दिल्या आहेत. परेश रावलच्या Krishna v/s Kanhaiya या हिंदी नाटकावर अक्षयच्या सिनेमा आधारीत आहे. आश्विनी यार्दी या सिनेमाचे दिग्दर्शन करणारा आहे.
 
आता सलमानने तात्काळ होकार दिल्यामुळे त्याच्यात आणि शाहरुख खानमध्ये होऊ शकणारा वाद टाळला आहे का? याचं उत्तर काही काळानेच मिळले. सलमानने होकार देण्यास विलंब केला असता तर अक्षयला शाहरुखचे दरवाजे ठोठावे लागले असते आणि त्या परिस्थितीत दोन खानांमध्ये परत नव्या मुद्दावर शीतयुद्धाचा भडका उडाला असता.
 
 

First Published: Sunday, March 11, 2012, 13:39


comments powered by Disqus