भार्गवीची पुन्हा एकदा लावणी - Marathi News 24taas.com

भार्गवीची पुन्हा एकदा लावणी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
'शर्यत' ही अपकमिंग फिल्म लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे झक्कास फक्कड लावणी! अभिनेत्री भार्गवी चिरमुलेवर ही लावणी पिक्चराईज्ड करण्यात आली आहे.
 
शर्यत या सिनेमातल्या फक्कड लावणीवर ठेका धरलाय अभिनेत्री भार्गवी चिरमुलेनी. लावणी म्हटली की लावणीचा फडही आलाच आणि म्हणूनच भार्गवीवर पिक्चराईज्ड करण्यात आलेली ही  लावणी उत्तम व्हावी यासाठी सेटवर उभारण्यात आलाय लावणीचा झक्कास फड. दिपाली विचारेच्या तालावर भार्गवीने ताल धरला आहे.
 
गावरान बाजाच्या या लावणीला स्वरसाज चढवला सारेगमप फेम गायिका उर्मिला धनगरने. चला तर, म्हणजे ही भिंगर बाहुली थिएटरमध्ये आलेल्या प्रेक्षकांना आपल्या तालावर ताल धरायला लावेल अशी आशा करुया.

First Published: Friday, November 11, 2011, 13:55


comments powered by Disqus