बेबो चालली सासरी - Marathi News 24taas.com

बेबो चालली सासरी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
काही दिवसापूर्वीच नवाब मन्सूर अली खान पतौडी हे अल्लाला प्यारे झाले आणि पतौडींच्या महाली शोककळा पसरली. त्यानंतर रितीनुसार सैफ अली खान हे नवे नवाब म्हणून तख्तनशीन झाले. नवाब पतौडींच्या निधनाने सैफ आणि करिनाचा निकाह लांबणीवर पडला. पण पुढच्या वर्षी म्हणजेच २०१२ मध्ये पतौडींच्या हवेलीवर शहनईचे सूर निनादणार आहेत. नुकतंच सैफने करिना सोबत लवकरच विवाहबध्द होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
सैफची स्वत:ची निर्मिती असेला एजंट विनोद प्रदर्शित झाल्यानंतर लग्न करण्याचा विचार असल्याचं सैफने म्हटलं आहे. सैफ अली खानच्या मातोश्री शर्मिला टागोर यांनी देखील लवकरच विवाह सोहळा संपन्न होईल असं म्हटलं आहे. एजंट विनोदचं प्रदर्शन जर लांबणीवर पडलं नाही तर फेब्रुवारी २०१२ मध्ये नाहीतर मार्च मध्ये बॉलिवूडचं हॉट कपल विवाह बंधनात अडकेल असं शर्मिला टागोर म्हणाल्या आहेत. बेबोच्या चाहत्यांना मात्र उसासे टाकण्याशिवाय पर्याय नाही हेच खरे.

First Published: Friday, November 11, 2011, 15:14


comments powered by Disqus