Last Updated: Tuesday, March 13, 2012, 09:29
www.24taas.com, मुंबई २००८ साली आलेल्या ‘जाने तू... या जाने ना’ या सिनेमाने बॉक्सऑफिसवर करिष्मा केला होता. ही युथफुल फिल्म प्रेक्षकांनी खूपच एन्जॉय केली. इम्रान खानचा हा पहिलाच सिनेमा असल्यामुळे या सिनेमाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं. आमीर खान प्रोडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली होती. तसंच इम्रान हा आमीरचा भाचा त्यामुळे खान कुटुंबाची ही नवी पिढीही इंडस्ट्रीमध्ये स्थिरावते का याबाबत इंडस्ट्रीमध्ये कमालीची उत्सुकता होती आणि इम्रानने सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत या सिनेमावर हिटची मोहर उमटवली. या सिनेमात इम्रानला जेनेलियानेही छान साथ दिली.या सिनेमातील गाणीही लोकप्रिय झाली.
आणि हिच झिंग पुन्हा एकदा आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे कारण या सिनेमाचा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. याआधी या सिनेमाचा सिक्वेल आणण्याबाबत या सिनेमाच्या टीममध्ये दुमत होतं मात्र आता एकमताने या सिनेमाचा सिक्वेल आणण्याचा विचार या सिनेमाच्या टीमने केला आहे. इम्राननेही या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला.
मात्र आता या सिनेमाची कथा कशी पुढे सरकते आणि इम्रानसह या सिनेमामध्ये जेनेलियाही असेल का, याबाबत मात्र दिग्दर्शक काही सांगायला तयार नाहीत.
First Published: Tuesday, March 13, 2012, 09:29