कोण बनणार 'मंदाकिनी'? - Marathi News 24taas.com

कोण बनणार 'मंदाकिनी'?

www.24taas.com, मुंबई
 
‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’ या सिनेमाचा सिक्वेल एकता कपूर घेऊन येत आहे आणि या सिक्वेलमध्ये झळकण्यासाठी बॉलिवूडच्या टॉपच्या चार अभिनेत्रींमध्ये रेस लागली आहे. ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’च्या सिक्वेलमध्ये इम्रान खान आणि अक्षय कुमार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे आता या सिनेमात अभिनेत्री म्हणून कोणाची वर्णी लागते याबाबत खूपच उत्सुकता आहे. या सिनेमातील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोण, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, आणि कतरिना कैफ या अभिनेत्रींनीमध्ये रेस लागली आहे. या चौघीही जणी सिल्व्हर स्क्रीनवर ही भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
 
मात्र या चौघी जणींपैकी सोनाक्षी सिन्हा हा सिनेमा आपल्या नावावर करेल अशी चिन्हं दिसत आहेत. कारण या सिनेमाआधीच सोनाक्षी अक्षय कुमारसह दोन सिनेमातून झळकणार आहे. त्यामुळे सोनाक्षीच्या डेट्स लगेच मिळतील अशीही चर्चा आहे.
 
तर बाकीच्या अभिनेत्री इतर सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे त्यांच्या डेट्स मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल असं या सिनेमाच्या टीमला वाटतंय. मात्र असं असलं तरी दीपिका, कतरिना आणि सोनम या अभिनेत्रींनी अद्याप हार मानलेली नाही. या रेसमध्ये बाजी मारण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. त्यामुळे या चौघींपैकी अखेर कोण ही भूमिका आपल्या नावावर करतं हे पाहणं इंटरेस्ट्रींग ठरेल.

First Published: Tuesday, March 13, 2012, 13:12


comments powered by Disqus