'सनी लिऑन' भारतात परतली - Marathi News 24taas.com

'सनी लिऑन' भारतात परतली

www.24taas.com, मुंबई
 
'बिग बॉस -५' मधील आपल्या वादळी आगमनाने वादग्रस्त ठरलेली सनी लिऑन पुन्हा भारतात आली आहे. या वर्षा अखेरीस ती अबिनय करणार असलेल्या 'जिस्म-२'चं शुटिंग सुरू होणार आहे.
 
'जिस्म-२' मध्ये सनी लिऑनसोबत रणदीप हूडा आणि अरुणोदय सिंगही काम करत आहेत. पूजा भट्ट हिये आपल्या ट्विटरवर सनी लिऑनचं स्वागत केलं आहे. “सनी लिऑन भारतात तुझं स्वागत आहे. तुझ्याबरोबर जिस्म-२ सुरू करण्याची खूप घाई झाली आहे.. मला तर आता वाटच पाहावत नाहीये.”
 
पाश्चात्त्य देशांतील टॉपची पॉर्न स्टार असणारी सनी लिऑन बिग बॉस-५मध्ये आल्यापासूनच चर्चेत होती. महेश भट्ट यांनी बिग बॉसच्या घरात जाऊन  तिला 'जिस्म-२' ची ऑफर दिली होती. अखेर १८ जानेवारी २०१२ रोजी तिने जिस्म -२ साईन केला. त्यानंतर तिचे एक सेन्सेशनल फोटोशूटही झाले. त्यानंतर सनी पुन्हा अमेरिकेला निघून गेली होती. काल ती मुंबईमध्ये परतली आहे. आणि लवकरच जिस्म-२साठी शूटिंग सुरू करणार आहे.

First Published: Thursday, March 15, 2012, 16:56


comments powered by Disqus