Last Updated: Tuesday, March 20, 2012, 16:18
www.24taas.com, मुंबई सिनेप्रेक्षकांसाठी खुषखबर ! ‘३ इडियट्स’नंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता आमीर खान आगामी सिनेमासाठी पुन्हा एकत्र येत आहेत. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन केलेल्या '३ इडियट्स'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेकिंग कलेक्शन केलं होतं. अनेकजणांचा हा आजही लाडका सिनेमा आहे.
“मला राजूच्या सिनेमात काम करायला नक्की आवडेल. पण, त्या सिनेमाची घोषणा राजूने स्वतःच करावी. सिनेमाचं स्क्रिप्ट खूप छान आहे. राजू हा उत्तम दिग्दर्शक आणि उत्तम माणूस आहे. आम्ही नव्या सिनेमाच्या स्क्रीप्टबद्दल यापूर्वी बरंच बोललो आहोत. पण, या सिनेमाची घोषणा त्यानेच केलेल बरी” असं आमीर म्हणाला.
आगामी सिनेमाचं नाव सध्या 'पीके' असं ठेवण्यात आलं आहे. आमीर आपल्या ‘सत्यमेव जयते’ या टीव्ही शोमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याने 'तलाश' या आपल्या सिनेमाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे पीके सिनेमाचं शुटींग त्यानंतरच सुरू होईल.
First Published: Tuesday, March 20, 2012, 16:18