Last Updated: Wednesday, March 21, 2012, 17:44
www.24taas.com, मुंबई हिंदी चित्रपट अभिनेता शाहीद कपूर आता नव्याने चर्चेत आला आहे. म्हणे त्याचं लफड सुरू आहे. आतापर्यंत अधिकृत तीन लफडी झाली आणि ब्रेक अपही झाला. मध्यंतरी गोव्यात वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्यासोबत अर्ध कपड्यातील मुली होत्या. त्याचे फोटोही टि्टवर टाकण्यात आले होते. त्यावेळी बॉलिवूडमध्ये खमंग च्रर्चाही झाली. आता तर रॉकस्टार गर्ल नर्गिस फर्की हिच्या बरोबर गुटरSSगू सुरू आहे. त्यामुळे पुन्हा शाहीदचे स्टार दिसू लागले आहेत.
शाहीद कपूर आपल्या सिनेमांपेक्षा अफेअर्समुळे जास्त चर्चेत राहतो. हा इतिहास झाला आहे. आतापर्यंत अभिनेत्री करिना कपूर, अमृता राव, विद्या बालन यांच्याशी शाहीदचं नाव जोडलं जात होतं. मात्र, शाहीदला या अभिनेत्रींनी तांदळातील खड्याप्रमाणे बाजूला सारले. बिचारा शाहीद एकटाच पडला. मात्र, प्रेमात माहिर असलेला शाहीद हार थोडीच मानणार. त्यांने आणखी एक पाऊल टाकून रॉकस्टार गर्ल नर्गिस फर्कीबरोबर सुत जमवलं आहे.
सध्या या दोघांमधलं प्रेम ऊतू चाललं आहे. नर्गिसच्या रुपात शाहीदला नवीन गर्लफ्रेंड मिळाली आहे. इतकचं नाही तर शाहीद म्हणे नर्गिसची खूपच काळजी घेत आहे. शिवाय या दोघांनी आता एकत्र राहायचं ठरवलं आहे. नर्गिसही शाहीदबरोबर लीव्ह इनमध्ये राहण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर दाखल झाली आहे. याबाबत हे दोघेही उघडपणे काही बोलले नसले तरी या दोघांच्या वागण्यावरुन हे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत का, हे मात्र कोणी सांगू शकत नाही. परंतु लफडं सुरू आहे, ही बाब खरी आहे.
First Published: Wednesday, March 21, 2012, 17:44