Last Updated: Tuesday, November 15, 2011, 14:34
झी २४ तास वेब टीम, मुंबईनरगिस फखरीने रॉकस्टारमधून पदार्पण केलं आणि पहिल्याच सिनेमाच्या यशाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. इमितियाज अलीच्या रॉकस्टारमधल्या तिच्या अदाकारीवर प्रेक्षक फिदा झाले आहेत. त्यामुळेच अवघा एक सिनेमा नावावर असताना नरगिसने दीपिका पदूकोण आणि सोनम कपूरलाही प्रसिध्दी आणि लोकप्रियतेत पिछाडीवर टाकल्याची बातमी आहे.
नरगिस फखरीला आता टाटा मोटर्स, पॅराशूट हेअर केअर आणि वॅन हूसैन या आघाडीच्या ब्रँडच्या जाहिरातींसाठी निवडण्यात आलं आणि लवकरच त्यासंबंधी घोषणा करण्यात येणार आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीला आघाडीच्या तीन ब्रँडच्या जाहिरातींमध्ये संधी मिळाल्याने तिने दीपिका पदूकोण आणि सोनम कपूरचाही विक्रम मोडीत काढला असं म्हणावं लागेल. भारतात एनआरआय अभिनेत्रींना मोठी मागणी आणि फॅन फॉलोईंग आहे आणि नरगिस त्याचा लाभ निश्चितच उठवेल.
First Published: Tuesday, November 15, 2011, 14:34